Wednesday, July 9, 2025

Savitri Jindal: काँग्रेस पक्षाला आणखी एक भगदाड! भारतातील सर्वात श्रीमंत महिलेने सोडला पक्ष

Savitri Jindal: काँग्रेस पक्षाला आणखी एक भगदाड! भारतातील सर्वात श्रीमंत महिलेने सोडला पक्ष

चंदीगढ : लोकसभा निवडणूकीच्या (Loksabha Election) पाशर्वभूमीवर बडे-बडे नेते काँग्रेस (congress) पक्षाची साथ सोडून देत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्ष चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्यातच आता भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल (savitri jindal) यांनीदेखील काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे.


नुकतेच काँग्रेस नेते नवीन जिंदाल यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाकडून त्यांना कुरुक्षेत्र मतदारसंघातून उमेदवारीही दिली आहे. तर आता नवीन जिंदाल यांची आई सावित्री जिंदाल यांनी काँग्रेस पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेस पक्ष सोडून दिला आहे. अशी माहिती सावित्री जिंदाल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.


''मी १० वर्षे आमदार म्हणून हिसारच्या जनतेचे प्रतिनिधित्व केले आणि मंत्री म्हणून नि:स्वार्थपणे हरियाणा राज्याची सेवा केली. हिसारची जनता हे माझे कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबाच्या सल्ल्यानुसार मी आज काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. काँग्रेस नेतृत्वाच्या पाठिंब्याबद्दल आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा मी सदैव ऋणी राहीन ज्यांनी मला नेहमीच पाठिंबा आणि आदर दिला'', असे सावित्री जिंदाल यांनी सांगितले.




Comments
Add Comment