Sunday, June 22, 2025

धक्कादायक! लैंगिक छळ प्रकरणी विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल

धक्कादायक! लैंगिक छळ प्रकरणी विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल


नराधमांनी छायाचित्रे पसरवण्याची दिली होती धमकी


पुणे : महिलांसोबत होणारी छेडछाड, लैंगिक छळ या प्रकरणी खबरदारी घेऊनदेखील अनेक ठिकाणी स्त्रियांना त्या गोष्टींना सामोरे जावे लागते. अशीच घटना पुणे येथील भारती विद्यापीठ आंबेगाव पठार परिसरात घडली. एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीने छेडछाडीला कंटाळून गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना धक्कादायक उघडकीस आली आहे.


महाविद्यालयात शिकणारी विद्यार्थीनी शिकवणीला जात असताना दोन नराधमांनी तिचा पाठलाग करत छेडछाड केल्या प्रकरणी विद्यार्थीनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.


अजिंक्य आवटे (रा. भोसरी), सुजल खुणे (रा. राम मंदिराजवळ, आंबेगाव पठार) अशी छेडछाडी प्रकरणी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत मुलीच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सोनाली मिठारे तपास करत आहेत.



नेमकं प्रकरण काय?


विद्यार्थीनी महाविद्यालय शिकवणीला जात असताना आरोपी अजिंक्य आणि सुजल यांनी तिचा पाठलाग करुन छेडछाड केली. दोघांनी तिची छायाचित्रे काढली. त्यानंतर छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन तिला त्रास देण्यास सुरुवात केली. गेले दोन महिने आरोपी तिला त्रास देत होते. त्यांच्या छेडछाडीमुळे मुलीने
राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे भारती विद्यापीठ परिसरात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >