मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४च्या(Ipl 2024) हंगामातील ८वा सामना आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवला जाईल. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदाबाद हे दोन संघ आमनेसामने असणार आहेत. हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल.
या सामन्यात आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा कर्णधार पॅट कमिन्स आणि हार्दिक पांड्या यांच्यात टक्कर असेल. कमिन्सला हैदराबादने एका हंगामासाठी२०.५० कोटी रूपये देऊन खरेदी केले आहे तर पांड्याला मुंबईने ट्रेडच्या माध्यमातून संघात सामील केले आहे. त्याला १५ कोटी मिळाले आहेत.
दोन्ही संघ खाते खोलण्याच्या इराद्याने उतरणार
दुसरीकडे दोन्ही संघ मुंबई आणि हैदराबाद यांनी या हंगामात आतापर्यंत एकालाही विजयाचे खाते खोलता आलेले नाही. त्यांचा हा दुसरा सामना आहे अशातच आज पांड्या आणि कमिन्स दोघेही खाते खोलण्याच्या दृष्टीने मैदानात उतरतील. हैदराबादला पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून ४ धावांनी पराभव सहन करावा लागला होता. तर मुंबईला गुजरात टायटन्सकडून ६ धावांनी हार मिळाली होती.