नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाने तीन राज्यांसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या तीनही यादींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, रस्ते परिवहन आणि राज्य मंत्री नितीन गडकरी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावांचा समावेश आहे.
तर संबंधित राज्यांतून अनेक मोठ्या भाजप नेत्यांना स्टार प्रचारक बनवण्यात आले आहे. राज्यातील स्टार प्रचारकांच्या यादीत अशीही नावे आहे जे विधानसभा निवडणुकीत हरले होते आणि सध्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना तिकीटही मिळालेले नाही. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी २५ दिवसांहून कमी वेळ शिल्लक आहे. १९ एप्रिलला देशात लोकसभा निवडणुकीअंतर्गत पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे.
बिहारमधून अश्विन चौबे स्टार प्रचारक
भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये अनेक अशी नावे आहेत ज्यांना तिकीट तर मिळालेले नाही आहे मात्र या यादीत सामील आहेत. बिहारमधून अश्वनी चौबे स्टार प्रचारकांच्या यादीत सामील आहेत. तर सय्यद शाहनवाज हुसैनही बिहारच्या स्टार प्रचारकांमध्ये आहेत.
राज्यांचे मुख्यमंत्रीही स्टार प्रचारक
अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही स्टार प्रचारकांच्या यादीत सामील आहेत. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही स्टार प्रचारक आहेत.