Thursday, December 12, 2024
Homeताज्या घडामोडीWeather update: कडक उन्हाळ्यात पावसाचा इशारा!

Weather update: कडक उन्हाळ्यात पावसाचा इशारा!

पुढील पाच दिवस या राज्यांत पाऊस आणि गारपीटीची शक्यता

नवी दिल्ली : देशभरात वातावरणात बदल होत असताना एकीकडे कडक उन तर दुसरीकडे हवामान खात्याने काही राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. आजपासून पुढील पाच दिवसात देशातील बहुतांश राज्यांमध्ये पाऊस तर डोंगराळ भागात बर्फवृष्टी होण्याचा अलर्ट दिला आहे. तसेच हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम हिमालय क्षेत्रातील वातावरण बदलामुळे काही भागात पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, नवी दिल्लीत आज २७ मार्च रोजी किमान तापमान १९ अंश आहे. तर कमाल तापमान ३४ अंश इतकं नोंदविण्यात आलं आहे. यामुळे नवी दिल्लीत आज हलक्या स्वरुपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे. २८ मार्च आणि २९ मार्च रोजीदेखील पावसाची शक्यता आहे. तर ३० मार्चला नवी दिल्लीत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता दर्शवली आहे.

२७ मार्चला या भागात पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या माहितीनुसार २७ मार्चला जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान, मुजफ्फराबादमध्ये पाऊस आणि गारपीटीची शक्यता आहे. तसेच हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्किम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड , मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामधील सुदूर या भागात पाऊस आणि गारपीटीची शक्यता आहे.

२८ मार्चला या भागात पावसाची शक्यता
हवामान विभागानुसार, २८ मार्चला हिमाचल प्रदेशाला गारपीटीची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशात जोरदार वारा, गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच पंजाब, पश्चिम बंगालमध्ये जोरदार वाऱ्यासह विजेच्या कडकडाट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद, हरियाणा आणि चंदीगड च्या सुदूरमध्ये विजेच्या कडकडाटासह हलक्या स्वरुपाचा पावसाची शक्यता आहे.

२९ मार्चला या भागात पवावसाची शक्यता
हवामान विभागानुसार, २९ मार्चला हिमाचल प्रदेशमध्ये हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच उत्तराखंडमध्ये विजेच्या कडकडाटासह गारपीटीची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, लडाख, राजस्थानमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

३० मार्चला या भागात पावसाची शक्यता
उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगालमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर उत्तराखंडमध्ये गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

३१ मार्चला या भागात पावसाची शक्यता
हवामान विभागानुसार, उत्तराखंडमध्ये गारपिटीची शक्यता आहे. तर हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये जोरदार वाऱ्यासह विजेच्या कडाकाडाटसह पावसाची शक्यता आहे. तसेच आसाम, मेघालयमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -