Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीभाजपाच्या स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर; पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे.पी.नड्डा, अमित शाह,...

भाजपाच्या स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर; पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे.पी.नड्डा, अमित शाह, योगी आदित्यनाथ यांचा समावेश

महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांच्यावर प्रचाराची जबाबदारी

मुंबई : भाजपाच्या स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. मध्य प्रदेश , बिहार आणि पश्चिम बंगालसाठी भाजपाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचाही भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे. महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांच्यावर प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे इतर राज्यांमध्ये जाऊन प्रचार करणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर मध्य प्रदेश आणि बिहार राज्याच्या स्टार प्रचारकाची जबाबदारी देण्यात आली हे. तर देवेंद्र फडणवीस यांनाही मध्य प्रदेशसाठी स्टार प्रचारक म्हणून नेमण्यात आले आहे. विनोद तावडे यांच्यावर बिहारच्या स्टार प्रचारकाची जबाबदारी देण्यात आली आहे. स्मृती ईराणी आणि मनोज तिवारी यांचीही नावे स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत.

लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपा उमेदवारांचा प्रचार करणाऱ्या भाजपा नेत्यांची नावे-

बिहार राज्यातील स्टार प्रचारक

१. नरेंद्र मोदी
२. जे.पी.नड्डा
३. राजनाथ सिंह
४. अमित शाह
५. नितीन गडकरी
६. योगी आदित्यनाथ
७. विनोद तावडे
८. सम्राट चौधरी
९. विजय कुमार सिन्हा
१०. गिरीराज सिंह
११. नित्यानंद राय
१२. अश्विनीकुमार चौबे
१३. दीपक प्रकाश
१४. सुशील कुमार मोदी
१५. नागेंद्रनाथ त्रिपाठी
१६. भिखुभाई दलसानिया
१७. संजय जयस्वाल
१८. मंगल पांडे
१९. रेणू देवी
२०. प्रेम कुमार
२१. स्मृती ईराणी
२२. मनोज तिवारी
२३. सय्यद शाहनवाज हुसेन
२४. नीरज कुमार सिंह
२५. जनक चमर
२६. अवधेश नारायण सिंह
२७. नवल किशोर यादव
२८. कृष्ण नंदन पासवान
२९. मोहन यादव
३०. मनन कुमार मिश्रा
३१. सुरेंद्र मेहरा
३२. शंभू शरण पटेल
३३. मिथिलेश तिवारी
३४. राजेश वर्मा
३५. धर्मशाला गुप्ता
३६. कृष्णकुमार ऋषी
३७. अनिल शर्मा
३८. प्रमोदकुमार चंद्रवंशी
३९. निवेदिता सिंह
४०. निक्की हेम्ब्रोम

पश्चिम बंगाल राज्यातील स्टार प्रचारक

१. नरेंद्र मोदी
२. जे.पी.नड्डा
३. राजनाथ सिंह
४. अमित शाह
५. योगी आदित्यनाथ
६. हिमंता विश्व सरमा
७. मानिक साहा
८. अर्जुन मुंडा
९. सुनील बन्सल
१०. मंगल पांडे
११. अमित मालवीय
१२. निसिथ प्रामाणिक
१३. सतपाल महाराज
१४. स्मृती ईराणी
१५. मुख्तार अब्बास नक्वी
१६. सुकांता मजुमदार
१७. सुवेंदू अधिकारी
१८. शंतनू ठाकूर
१९. स्वप्न दासगुप्ता
२०. दिलीप घोष
२१. राहुल सिन्हा
२२. मिथुन चक्रवर्ती
२३. देबश्री चौधरी
२४. समिक भट्टाचार्य
२५. नागेंद्र रॉय
२६. दिपक बर्मन
२७. जगन्नाथ चट्टोपाध्याय
२८. मफुजा खातून
२९. सुशील बर्मन
३०. सुकुमार रॉय
३१. निखिल रंजन डे
३२. मिहीर गोस्वामी
३३. मालती रवा रॉय
३४. डॉ. शंकर घोष
३५. जोयल मुर्मू
३६. गोपालचंद्र साहा
३७. सद्रथ तिर्की
३८. रुद्रनील घोष
३९. अमिताव चक्रवर्ती
४०. सतीश धोंड

मध्य प्रदेश राज्यातील स्टार प्रचारक

१. नरेंद्र मोदी
२. जे.पी.नड्डा
३. राजनाथ सिंह
४. अमित शाह
५. नितीन गडकरी
६. शिव प्रकाश
७. डॉ. मोहन यादव
८. विष्णु दत्त शर्मा
९. महेंद्र सिंह
१०. सतीश उपाध्याय
११. सत्यनारायण जातिया
१२. जगदीश देवडा
१३. राजेंद्र शुक्ला
१४. शिवराज सिंह चौहान
१५. भूपेंद्र पटेल
१६. ज्योतिरादित्य सिंधिया
१७. वीरेंद्रकुमार खाटिक
१८. फग्गनसिंह कुलस्ते
१९. स्मृती ईराणी
२०. योगी आदित्यनाथ
२१. भजनलाल शर्मा
२२. देवेंद्र फडणवीस
२३. केशव प्रसाद मौर्य
२४. हिमंता बिस्वा सरमा
२५. विष्णु देव साई
२६. हितानंद
२७. प्रल्हाद पटेल
२८. कैलाश विजयवर्गीय
२९. जयभान सिंह पवैया
३०. राकेश सिंह
३१. लालसिंग आर्य
३२. नारायण कुशवाह
३३. तुलसी सिलवट
३४. निर्मला भुरिया
३५. ऐदल सिंह कंसाना
३६. गोपाल भार्गव
३७. नरोत्तम मिश्रा
३८. सुरेश पचौरी
३९. कविता पाटीदार
४०. गौरीशंकर बिसेन

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -