नवीदिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाने ईडी कोठडी सुनावली असून जेलमधूनच ते सरकारचं कामकाज पाहत आहेत. दरम्यान, केजरीवालांची प्रकृती बिघडली आहे. ईडी कोठडीमध्ये असलेल्या केजरीवाल यांची शुगर लेव्हल कमी झाली आहे. मागच्या काही तासांपासून शुगर लेव्हल खाली-वर येत असल्याची माहिती मिळाली असून केजरीवाल यांचं शुगर लेव्हल ४६ पर्यंत खाली गेलं आहे. तर शुगर खाली जाणं धोक्याचं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणात आरोप लावण्यात आले आहेत. गुरुवारी ईडीने अटक केली असून शुक्रवारी कोर्टाने त्यांना सहा दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. अरविंद केजरीवाल यांना आणखी एक धक्का बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला.