आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुका आणि हरियाणातील पोटनिवडणुकांसाठीही केली यादी जाहीर
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Elections) भाजपची (BJP) जोरदार तयारी सुरु असून भाजपने उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील अमरावतीमधून नवनीत राणा (Navneet Rana) आणि कर्नाटकातील चित्रदुर्गातून गोविंद करजोल (Govind Karjol) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नवनीत कौर राणा या अमरावतीच्या विद्यमान खासदार आहेत ज्यांनी २०१९ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. २०२४ च्या निवडणुकीसाठी भाजप अमरावतीमधून राणा यांना उमेदवारी देईल अशी अटकळ होती. चित्रदुर्गात भाजपने विद्यमान खासदार आणि राज्यमंत्री ए नारायणस्वामी यांच्या जागी गोविंद करजोल यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष सत्ताविरोधी लढा देत असलेल्या नारायणस्वामी यांच्या बदलीचा शोध घेत होता, त्यातूनच करजोल यांची निवड करण्यात आली.
BJP releases its seventh list of candidates for the Lok Sabha elections.
Navneet Rana fielded from Amravati constituency in Maharashtra. pic.twitter.com/rfdLYckZUl
— ANI (@ANI) March 27, 2024
भाजपाने आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुका आणि हरियाणातील पोटनिवडणुकांसाठीही आपली यादी जाहीर केली आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या कर्नालमधून हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी निवडणूक लढवणार आहेत.
BJP releases its list of candidates for the Andhra Pradesh Assembly elections pic.twitter.com/3O0aAeswz9
— ANI (@ANI) March 27, 2024