मुंबई: IPL 2024मध्ये २५ मार्चला खेळवल्या गेलेल्या एका सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सला ४ विकेटनी हरवले होते. या सामन्यादरम्यान जेव्हा आरसीबीचा विराट कोहली फलंदाजी करत होता त्या दरम्यान सुरक्षेदरम्यान चूक घडल्याचे पाहायला मिळाले.
एक चाहता मैदानात अचानक घुसला आणि तो विराट कोहलीच्या पाया पडला. जेव्हा सुरक्षा रक्षक तेथे आले तेव्हा त्याने कोहलीला जोरात पकडले होते. सुरक्षा रक्षकांनी त्या चाहत्याला पकडून बाहेर काढले. या प्रकरणी एक आश्चर्यजनक दावा करणारा व्हिडिओ व्हायरल केला जात आहे.
The fan who obstructed the field to meet Virat Kohli was beaten up black and blue.
Thoughts?pic.twitter.com/BZ4SKI6f5d
— Sameer Allana (@HitmanCricket) March 27, 2024
या व्हिडिओमध्ये दावा केला जात आहे की मैदानाच्या बाहेर येऊन सुरक्षा रक्षकांनी त्या चाहत्याला लाथ आणि बुक्क्यांनी मारहाण केली.
काही युजर्सनी या मारहाणीबद्दल जोरदार टीका केली आहे. तर इतर काही युजर्सनी कमेंट करताना हे योग्य म्हटले होते. पंजाब किंग्सविरुद्ध या सामन्यात विराट कोहलीने ४९ बॉलमध्ये ७७ धावांची खेळी केली होती.