
नवी दिल्ली: दिल्लीतील दारू घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने केजरीवाल यांच्या अटकेविरोधात ईडीला उत्तर देण्यासाठी २ एप्रिलपर्यंतची वेळ दिली आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी ३ एप्रिलला होणार आहे.
या प्रकरणाची सुनावणी बुधवारी सकाळी सुरू करण्यात आली होती. अरविंद केजरीवाल यांच्याकडून ईडीने तब्बल २ तास चौकशी केल्यानंतर त्याच्या अधिकृत निवासस्थानावरून अटक केली होती. दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात राऊज एव्हेन्यू कोर्टाने २८ मार्चपर्यंत ईडीच्या कस्टडीत पाठवले होते.
ईडीकडून अटक आणि कस्टडीला आव्हान देणाऱ्या केजरीवाल यांच्या याचिकेवर स्वर्णकांता शर्मा यांच्या न्यायालयाने नोटीस जारी करत ईडीकडून उत्तर मागितले आहे. ईडीला २ एप्रिलपर्यंत उत्तर द्यायचे आहे. न्यायलयात या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ एप्रिलला होणार आहे.
केजरीवाल यांच्या वकिलांनी दिल्लीचे मुख्यमंत्री यांची तात्काळ सुटका आणि प्रकरणात तत्काळ सुनावणीची मागणी केली होती. दरम्यान, ईडीने तत्काळ सुनावणीला विरोध केला होता आणि केजरीवाल यांचे अॅप्लिकेशन आणि रिट याचिकेवर उत्तर देण्यासाठी वेळ मागितली होती. उच्च न्यायालयाने बुधवारी ईडीला उत्तर देण्यासाठी २ एप्रिलपर्यंतचा वेळ दिला आहे आणि प्रकरणाची सुनावणी ३ एप्रिलला होत आहे.
कोर्टाने म्हटले ईडीचे उत्तर गरजेचे
कोणत्याही प्रकरणाची सुनावणी आणि निर्णय देताना न्यायालयाचे नैसर्गिक सिद्धांत लक्षात घेता दोन्ही पक्षांना निष्पक्षपणे ऐकणे गरजेचे असते. सध्याच्या प्रकरणात ईडीचे उत्तर आवश्यक आणि महत्त्वाचे आहे.