कोल्हापूर : नवीन चिखली पैकी सोनतळी येथे राहणाऱ्या रुक्साना शाहरुख झाडी यांच्या घरी त्यांच्या भाचीनेच चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आत्याचे बंद घर फोडून कपाटातील सव्वादोन तोळे सोने आणि २० हजार रुपयांची चोरी करणाऱ्या अल्पवयीन भाचीसह तिच्या मैत्रिणीला मंगळवारी करवीर पोलीसांनी अटक केली आहे. चैनीसाठी चोरी करणाऱ्या दोन्ही संशयितांकडून पोलीसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे.
फिर्यादा रुक्साना शाहरुख झाडी या कोल्हापूर शहरातील एका रुग्णालयात काम करतात. झाडी या त्यांच्या लहान मुलगा भाचीसोबत राहत होत्या. कपडेलत्त्यासह तिच्या शाळेतील खर्चांची जबाबदारीही त्या स्वत: पेलत असे. गुरुवारी सायंकाळी झाडी कामावर गेल्या असताना सकाळी परतल्यावर घरातील सर्व सामान नासधूस झाले होते. तसेच बॅगा, कपाट उघडे दिसून त्यातील २२ग्रॅमचे सोने आणि २० हजाराची रोकडही लंपास केल्याचे निदर्शनास आले. त्यानी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. बोटांचे ठसे आणि संशयावरुन पोलीसांनी फिर्यादा रुक्साना शाहरुख झाडी यांच्या अल्पवयीन भाचीला ताब्यात घेतले. अधिक चौकशीदरम्यात मैत्रिणीचाही समावेश असल्याचे भाचीने कबुल केले.
करवीरचे पोलिस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर व पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी केली होती. सोनतळी येथील दोन मुली सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी वडनगै काटा वैधील एका हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक आकाशदीप भोसले, जालिंदर जाधव, हवालदार विजय तळसकर, सुजय दावण यांना मिळाली पथकाने दोनही मुलींना ताब्यात घेतले. मोपेडची तपासणी केली असता त्यामध्ये सोन्याचे दागिने, रोकड आढळून आली पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी प्रश्नांचा भडीमार करताय दोघींनी घर फोडून चोरी केल्याची कबुली दिली.