Sunday, June 15, 2025

गाजर लाल आणि मुळा सफेद का असतो? कोणत्या कारणामुळे बदलतात भाज्यांचे रंग

गाजर लाल आणि मुळा सफेद का असतो? कोणत्या कारणामुळे बदलतात भाज्यांचे रंग

मुंबई: बाजारात जेव्हा तुम्ही भाजीवाल्याकडे जाता तेव्हा तेथे रंगीबेरंगी भाज्या दिसतात. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की अखेर या भाज्यांचे रंग वेगवेगळे का असतात. जसे गाजर हे नारंगी अथवा लाल रंगाचे, टोमॅटो लाल रंगाचे, मिरची हिरव्या रंगाती आणि मुळा सफेद का असतो? जाणून घेऊया यामागचे विज्ञान



गाजराचा रंग लाल अथवा नारंगी का असतो?


गाजरचा रंग फक्त लालच नसतो तर हे नारिंगी रंगाचेही असतात. थंडीच्या दिवसात लाल गाजर मोठ्या प्रमाणात असतात. तर उन्हाळ्याच्या दिवसांत नारंगी रंगाचे मिळते. तुम्हाला माहीत आहे का गाजरामध्ये हा रंग कुठून येतो. खरंतर, गाजरामध्ये बीटा कॅरोटिन नावाचे पिगमेंट आढळते. याच कारणामुळे भाज्यांचा रंग लाल होतो. या पिंगमेंटमुळे इंग्रजीमध्ये याला कॅरेट म्हणतात.



मुळ्याचा रंग सफेद का असतो?


गाजराप्रमाणेच मुळाही जमिनीच्या आत उगवणारी भाजी आहे. मात्र आता सवाल हा आहे की जर दोन्ही एकाच पद्धतीने उगवतात तर गाजराचा रंग लाल आणि मुळ्याचा रंग सफेद का असतो. जेव्हा अनेकांना हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा उत्तर आले की यात एंथोसायनिन नावाचे केमिकल असते. याच कारणामुळे मुळ्याचा रंग सफेद असतो. भाज्यांना विविध रंग देण्यात या केमिकलची महत्त्वाची भूमिका असते.

Comments
Add Comment