Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीचोराची करामत! पोलिसांच्या हातावर तुरी देत पुन्हा त्याच घरात केली चोरी

चोराची करामत! पोलिसांच्या हातावर तुरी देत पुन्हा त्याच घरात केली चोरी

पंजाब : वारंवार चोरीच्या घटना घडत असतात. अनेक घटनांमध्ये पोलीस चोरांना पकडण्यात यशस्वी होतात. परंतु, काही घटनांमध्ये चोर पोलिसांना चकमा देत पळून जातात. अशीच एक घटना पंजाबमधील जालंधरयेथे श्री गुरु गोविंद सिंह एवेन्यू उच्चभ्रू परिसरात घडली आहे. दिवसाढवळ्या चोरी करण्यासाठी एका घरात घुसलेला चोर पोलिसांना चकमा देत चोरीची घटना घडली आहे. घटनास्थळावरुन फरार झाला. पण धक्कादायक गोष्ट अशी की, त्याच चोराने दीड तासानंतर कपडे बदलून पुन्हा त्याच घरात चोरी केली असल्याचे उघडकीस झाले आहे.

जालंधरमधील एका घरात दिवसाढवळ्या चोर घुसल्याचा आसपासच्या लोकांना संशय आला होता. लोकांनी तात्काळ त्याची माहिती पोलिसांना कळवली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं. घराच्या गेटबाहेर साध्या वेशातील पोलिसांचा ताफा उभा राहिला. चोराने भिंतीवरुन उडी मारत घराच्या बाहेर पडला. परंतु, पोलीस त्याला पकडणार इतक्यात चोराने पोलिसांनी धक्का देत तिथून पळ काढला.

चोराला पकडण्यात अपयशी ठरलेले पोलीस घटनास्थळावरुन निघून गेले. याचा फायदा घेत त्याच चोराने दीड तासांनी पुन्हा कपडे बदलून पुन्हा त्याच घरात चोरी करण्यासाठी शिरला. हा सर्व प्रकार शेजारच्या घराजवळ लागलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ज्या घरात चोर घुसरला त्या घरात केवळ दोन वृद्ध राहातात, त्यांची मुलं कामानिमित्ताने परदेशात स्थायिक झाल्याची माहिती शेजारच्यांनी दिलीय. चोराने घारतील किती मुद्देमाल लंपास केला याची माहिती पोलिसांना अद्यापही मिळाली नाही.

विशेष म्हणजे दुसऱ्यांदा चोरी करुन पळतानाही शेजारच्यांनी पाहिलं आहे. मात्र त्याला पकडण्यात अपयश आलंय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या संपूर्ण घटनेची रामामंडी पोलीस तपास करत आहेत. चोरांना पोलिसांचाही धाक राहिला नसल्याच्या प्रतिक्रिया परिसरातील नागरिक देत असून या घटनेने भीतीचं वातावरण पसरलं आहे. लोकांनी या ठिकाणी पोलीस पेट्रोलिग वाढवण्याची मागणी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -