Tuesday, July 1, 2025

Maharashtra Weather: राज्यात काही भागात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता

Maharashtra Weather: राज्यात काही भागात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता

मुंबई: देशभरात आता कडक उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यातच येत्या २४ तासांत देशासह राज्यातह काही भागात पावसाच्या सरी कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. अचानक वाढलेल्या तापमानाने साऱ्यांनाच घाम फुटत आहे. उन्हाच्या काहिलीने जीव हैराण होत असतानाच पुढील २४ तासांना राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त कऱण्यात आली आहे. त्यामुळे या काहिलीपासून थोडीफार सुटका होण्याची शक्यता आहे.


भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशामध्ये पुढील २४ तासांमध्ये पश्चिम बंगाल, सिक्कीम, उत्तर ओडिसा, पूर्व झारखंड, छत्तीसगड, पूर्व विदर्भ तसेच अरूणाचल प्रदेशमधील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यावेळी सोसाट्याचा वाराही वाहू शकतो.



राज्यात या ठिकाणी कोसळणार सरी


राज्यातही अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. येत्या २४ तासात विदर्भातील चंद्रपूर तसेच गडचिरोलीत गडगडाटासह गारपीट होण्याची शक्यता आहे. गडगडाटी वादळासह पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तसेच सोसाट्याचा वाराही वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Comments
Add Comment