क्रिश’ चित्रपट मालिकेतील पहिला चित्रपट ‘कोई मिल गया’ होता. ज्यामध्ये हृतिकसोबत रेखा आणि प्रीती झिंटा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. त्यावेळी प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद आणि भरभरून प्रेम दिले होते. ‘क्रिश २’ मध्ये हृतिक रोशन नायक तर प्रियंका चोप्राची प्रमुख नायिका होती. हा चित्रपटही प्रेक्षकांना तितकाच आवडला होता. त्यानंतर आलेल्या ‘क्रिश ३’ मध्ये हृतिकसोबत कंगना राणावत आणि विवेक ओबेरॉय झळकले होते. क्रिशचे क्रेझ लागल्यामुळे सर्व चाहत्यांच्या नजरा मालिकेतील पुढच्या चित्रपटाकडे वळल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ‘क्रिश ४’ चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यादरम्यान, चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश रोशन आणि प्रमुख अभिनेता हृतिक रोशन सध्या ‘क्रिश ४’ साठी काम करत असून, या वर्षाच्या शेवटापर्यंत पटकथा निश्चित होणार आहे. याची चित्रपटाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. सध्या हृतिक ‘वॉर २’ चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त असला तरी, ‘क्रिश ४’च्या पटकथेवरही त्याचे लक्ष आहेच.
‘क्रिश ४’ अंतराळ प्रवासावर आधारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. राकेश आणि हृतिक रोशन २०२५ मध्ये ‘क्रिश’ मालिकेतील चौथ्या भागाचे चित्रीकरण सुरू करण्याचा विचार करत आहे. दरम्यान, नुकत्याच समोर आलेल्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, चित्रपटाच्या टीमने मोठ्या प्रमाणात संशोधन केले असून आणि त्यानंतर अनेक कल्पना चित्रित केल्या आहेत. तसेच राकेश आणि हृतिक यांना प्रेक्षकांसमोर दमदार चित्रपट सादर करायचा असल्यामुळे चित्रपटाची पटकथा अंतिम करण्यासाठी ते वेळ घेत आहेत. जर या वर्षाच्या शेवटापर्यंत पटकथा निश्चित झाली तर २०२५ मध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होईल.