मुंबई: सोमवारी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स हे दोन संघ आमनेसामने होते. आरसीबीने शिखर धवनच्या नेतृत्वात पंजाब किंग्सला ४ विकेटनी हरवले. या पद्धतीने फाफ डू प्लेसिसच्या संघाला पहिला विजय मिळवता आला. तर पंजाब किंग्सविरुद्ध विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत. राजस्थान रॉयल्स पहिल्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्स दुसऱ्या आणि गुजरात टायटन्स तिसऱ्या स्थानावर आहे.
आरसीबीच्या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये किती बदल?
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्स चौथ्या स्थानावर आहे तर पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरू अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहे. दरम्यान, या सर्व संघांचे २-२ गुण आहेत. याशिवाय सनरायजर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांना पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. पॉईंट्स टेबलमधील टॉप ४ संघ प्लेऑफसाठी क्वालिफाय करतील.
बंगळुरूचा हंगामातील पहिला विजय
सोमवारच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सला ४ विकेटनी हरवले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर विजयासाठी १७७ धावांचे आव्हान होते. फाफ डू प्लेसिसच्या संघाने १९.२ षटकांत ६ विकेट गमावत हे आव्हान पूर्ण केले. आरसीबीसाठी विराट कोहलीने सर्वाधिक ४९ बॉलमध्ये ७७ धावा केल्या. तर दिनेश कार्तिकने शेवटच्या १० बॉलमध्ये २८ धावा करत सामना संपवला.