Thursday, June 12, 2025

३० मार्चपासून BJP फुंकणार निवडणुकीचे रणशिंग, पंतप्रधान मोदींची मेरठमध्ये मोठी रॅली

३० मार्चपासून BJP फुंकणार निवडणुकीचे रणशिंग, पंतप्रधान मोदींची मेरठमध्ये मोठी रॅली

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्ष(bjp) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी(loksabha election 2024) सर्वाधिक जागा असलेले राज्य उत्तर प्रदेशातून आपल्या निवडणूक प्रचाराची सुरूवात करत आहे. याची सुरूवात ३० मार्चपासून होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मेरठ येथून एक मोठी रॅली काढून याची सुरूवात करतील. यादरम्यान जयंत चौधरीही त्यांच्यासोबत असतील. भाजपाने मेरठ लोकसभा मतदार संघातून अरूण गोविल यांना तिकीट दिले आहे.


भाजपने उत्तर प्रदेशातील ६४ जागांवर आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यात २४ मार्चला पक्षाने राज्यातील १३ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. येथे माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांना सुल्तानपूर येथून पुन्हा संधी मिळाली आहे. त्यांचे सुपुत्र आणि पिलभीतचे खासदार वरूण गांधी यांचे तिकीट कापण्यात आले आहे. त्यांच्या जागी जितीन प्रसाद यांना मैदानात उतरवण्यात आले आहे.


भाजपने पाचव्या यादीत उत्तर प्रदेशातील एकूण १३ उमेदवार घोषित केले होते. यात पक्षाने आपल्या ९ सध्याच्या खासदारांना संधी दिली नाही. पक्षाने ज्या नऊ खासदारांचे तिकीट कापले त्यात गाझियाबादचे खासदार वीके सिंह, पिलभीतचे खासदार वरूण गांधी, बरेलीचे खासदार संतोष गंगवार, कानपूरचे सत्यदेव पचौरी, बदायूंचे माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्या यांची सुपुत्री डॉक्टर संघमित्रा मौर्य, बाराबंकी येथून उपेंद्र सिंह रावत, हाथरस येथून राजवीर सिंह दिलेर, बहराईच येथून अक्षयवर लाल गौड आणि मेरठचे खासदार राजेंद्र अग्रवाल यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment