Sunday, August 31, 2025

महाडमधील विशिष्ट होळी; दोन गटात निखारे फेकून देव-दानवांच प्रतिकात्मक युद्ध

महाडमधील विशिष्ट होळी; दोन गटात निखारे फेकून देव-दानवांच प्रतिकात्मक युद्ध

रायगड : प्रत्येक ठिकाणी विविध पद्धतीने होळी खेळली जाते. रायगड जिल्ह्यातील महाड शहरात गवळ आळी या ठिकाणी होळी उत्सव विशिष्ट पद्धतीने साजरा केला जातो. या उत्सवात ग्रामस्थांच्या दोन गटात निखारे फेकून देव-दानवांच प्रतिकात्मक युद्ध खेळलं जात.

गवळ आळी ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून चालू असणाऱ्या या प्रथेत पारंपारिक पद्धतीने होळी दहन केली जाते. त्यानंतर ग्रामस्थांचे दोन गट करुन होळी दहनानंतर त्यातील जळती लाकडे आणि निखारे दोन्ही गटातील लोकांकडून एकमेकांवर फेकण्याची परंपरा आहे. देव- दानवाची परंपरा असणाऱ्या या युद्धात तरुण मोठ्या प्रमाणात सहभागी झाले असतात. देव-दानव यांमधील प्रतिकात्मक युद्ध पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

Comments
Add Comment