नवी दिल्ली : बॉलीवूड क्वीन कंगना रणौतला भारतीय जनता पक्षाने मंडी लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिले आहे, ही देशातील दुसरी सर्वात मोठी संसदीय जागा आहे. २०२१ मधील पोटनिवडणुकीत कंगना मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची बरीच चर्चा चालू होती. मात्र त्यावेळी भाजपाने कंगना ऐवजी कारगिल हिरो कुशल ठाकूर यांना उमेदवार केले होते.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकी संदर्भात अनेक दिवसांपासून कंगना निवडणुकीच्या रिंगणात असल्याबद्दल प्रत्येक व्यासपीठावरून आवाज उठवला जात होता. गेल्या अनेक दिवसांमध्ये तिला उमेदवारी मिळेल अशी चर्चा सुरू होती. आता भाजपा हायकमांडने या चर्चेला पूर्णविराम देत लोकसभा उमेदवारांच्या पाचव्या यादीत अखेर कंगनाला मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषित केले आहे. यंदा कंगना पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहे.