Tuesday, July 1, 2025

काँग्रेसच्या प्रवक्त्याने केलेल्या आक्षेपार्ह पोस्टवर कंगना राणावतचे सडेतोड प्रत्युत्तर...

काँग्रेसच्या प्रवक्त्याने केलेल्या आक्षेपार्ह पोस्टवर कंगना राणावतचे सडेतोड प्रत्युत्तर...

नवी दिल्ली : भाजपाकडुन मंडी लोकसभा मतदारसंघात कंगना राणावत यांना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसच्या महिला प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. कंगना राणावत ह्याचा एक फोटो पोस्ट करून ‘मंडी मे क्या भाव क्या चल रहा है’ असा प्रश्न सुप्रिया श्रीनेत यांनी विचारला आहे. सुप्रियाच्या या पोस्टला कंगनाने सडेतोड उत्तर दिले आहे. कंगनाने सुप्रिया श्रीनेत दिलेले उत्तर समाजमाध्यमात व्हायरल होत आहे.





कंगना यांनी पोस्टमध्ये म्हणले आहे की, ‘प्रिय सुप्रिया, कलाकार म्हणून माझ्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत मी सर्व प्रकारच्या महिलांच्या भूमिका केल्या आहेत. ‘राणी’मधील एका भोळ्या मुलीपासून ते ‘धाकड’मधील मोहक गुप्तहेरापर्यंत, ‘मणिकर्णिका’मधील देवीपासून ‘चंद्रमुखी’तील खलनायिकेपर्यंत, ‘रज्जो’मधील देहव्यापार करणाऱ्या महिलेपासून थलायवीतील क्रांतिकारक नेत्यापर्यंत.


आपण आपल्या मुलींना पूर्वग्रहांच्या बंधनातून मुक्त केले पाहिजे, आपण त्यांच्या शरीराच्या अवयवांबद्दलच्या कुतुहलापलिकडे गेले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण देहव्यापार करणाऱ्यांचे संरक्षण केले पाहिजे तसेच त्यांना चांगला पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे… प्रत्येक स्त्री तिच्या सन्मानास पात्र आहे…’

Comments
Add Comment