Friday, May 9, 2025

क्रीडाताज्या घडामोडीIPL 2025

RR vs LSG: राजस्थानने लखनऊच्या तोंडातून हिरावून घेतला विजयाचा घास, १७व्या हंगामात विजयी सलामी

RR vs LSG: राजस्थानने लखनऊच्या तोंडातून हिरावून घेतला विजयाचा घास, १७व्या हंगामात विजयी सलामी

जयपूर: ऱाजस्थान रॉयल्स(rajasthan royals) आणि लखनऊ सुपर जायंट्स(lucknow super giants) यांच्यात आयपीएल २०२४चा चौथा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात राजस्थानने लखनऊला २० धावांनी हरवले. राजस्थान रॉयल्सने पहिल्यांदा खेळताना २० ओव्हरमध्ये १९३ धावा केल्या.


त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊच्या संघाने सुरूवातीला जास्त विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे त्यांना १७३ धावाच करता आल्या. सामन्यात संजू सॅमसनने ५२ चेंडूत ८२ धावांची खेळी केली. यात ३ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता.


रियान पराग या सामन्याचा हिरो ठरला. त्याने २९ चेंडूत ४३ धावा केल्या. केएल राहुल आणि निकोलस पूरनची ८५ धावांच्या भागीदारीने सामन्यात रोमांच आणली. केएल राहुलने ४४ बॉलमध्ये ५८ धावा केल्या तर निकोलस पूरनने ४१ चेंडूत ६४ धावांची खेळी केली. पूरन शेवटपर्यंत क्रीझवर टिकून होता मात्र आवेश खानच्या धारदार गोलंदाजीने राजस्थानचा विजय निश्चित केला. या सामन्यात राजस्थानने लखनऊला २० धावांनी हरवले.

Comments
Add Comment