Saturday, April 26, 2025
Homeताज्या घडामोडीहोळीला महागडा फोन असा ठेवा सुरक्षित, पाणी आणि गुलालने नाही होणार खराब

होळीला महागडा फोन असा ठेवा सुरक्षित, पाणी आणि गुलालने नाही होणार खराब

मुंबई: होळी खेळताना सगळ्यात मोठी भीती असते ती स्मार्टफोनची. होळी खेळताना आपला फोन खराब होण्याची अधिक शक्यता असते. पाणी आणि गुलालमुळे अनेकदा स्मार्टफोन खराब होण्याची भीती असते.

असा ठेवा फोन सुरक्षित

आज आम्ही तुम्हाला अशा एका वस्तूबद्दल सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही महागडा हँडसेट सुरक्षित ठेवू शकता. आम्ही तुम्हाला zip lock bag बद्दल सांगत आहोत. अॅमेझॉन अथवा फ्लिपकार्टवर तुम्हाला १५०-२०० रूपयांना सहज मिळू शकते. लोकल मार्केटमध्ये तुम्हाला कमी किंमतीत हे मिळू शकते.

Blink It वरून तुम्ही हे खरेदी करू शकता. १५-२० मिनिटांत याची डिलीव्हरी मिळू शकते. झिप लॉक बॅग या स्टँडर्ड साईजमध्ये येतात मात्र जर तुमच्याकडे मोठ्या स्क्रीनचा फोन असेल तर साईझ नक्की चेक करा.

या झिप लॉक बॅगमध्ये तुम्हाला अडकवण्याची सोयही असते.

होळीदरम्यान जर फोनमध्ये पाणी गेले आणि त्याने काम करणे बंद केले तर याच्या डिव्हाईसची वॉरंटी संपू शकते.

कलरमुळेही होऊ शकते नुकसान

जर तुम्ही पाण्याने नाही तर गुलालने होळी खेळत आहात तर गुलाल तुमच्या डिव्हाईसच्या पोर्टमध्ये जाऊन खराब होऊ शकतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -