मुंबई: आजकाल बाजारात विविध प्रकारच्या पाण्याच्या बाटल्या मिळतात ज्यात सर्वाधिक वापर हा प्लास्टिकच्या बाटल्यांचा असतो. मात्र प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे अनेकजण प्लास्टिकच्या बाटलीऐवजी तांब्याच्या बाटलीचा पर्याय निवडतात. मात्र तुम्हाला याचे फायदे आणि नुकसान माहीत आहे का?
जाणून घ्या फायदे
तांब्याच्या बाटलीतून पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. तांब्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरसचे गण अधिक असतात जे रोगांपासून लढण्यास मदत करतात. याशिवाय तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने त्वचा आणि केसांना खूप फायदा होतो. हृदयरोगापासून बचाव होतो. पचनक्रिया सुरळीत होते. सोबतच आपण दिवसभर एनर्जेटिक राहतो.
जाणून घ्या नुकसान
तांब्याच्या बाटलीतून पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते मात्र अनेकदा ही नीट स्वच्छ केली नाही तर उल्टी अथवा पोटाची समस्या जाणवते. गर्भवती महिलांनी तांब्याच्या भांड्यातून पाणी पिऊ नये. जर तुम्हाला कोणती अॅलर्जी असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. जास्त वेळ तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवू नका. ८ ते १२ तासच पाणी त्या बाटलीत ठेवा.