मुंबई: अनेक जण उन्हाळा सुरू झाला की अंडी खाणे बंद करतात. त्यांना वाटते गरमीमुळे अंडी खाल्ल्याने शरीरात नुकसान होऊ शकते. मात्र सवाल असा आहे की हे करणे योग्य आहे का?
उन्हाळ्यात अंडी खाल्ल्याने कोणतेही नुकसान होत नाही मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ते खाण्याचे प्रमाण. योग्य प्रमाणात अंडी खाल्ल्यास कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही.
अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते जे आरोग्यासाठी चांगले असते. उन्हाळ्याच्या दिवसात शरीराच्या हिशेबाने एक अथवा दोन अंडी खाऊ शकता.
अंड्यामध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणात असल्याने लाल रक्त पेशींची निर्मिती होते. सोबतच यामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढते. सोबतच धोकादायक आजारांचा धोका कमी होतो.
अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते जे हाडे मजबूत होण्यास मदत करतात. अंड्यांमध्ये ल्युटिन आणि जॅक्सेंथिन नावाचे अँटीऑक्सिडंट असते. यामुळो डोळ्याच्या रेटिनामध्ये जमलेली घाण दूर होते आणि मोतीबिंदूचा धोका कमी होतो.