Thursday, July 25, 2024
Homeसाप्ताहिककोलाजक्राइम गाडी

क्राइम गाडी

क्राइम अ‍ॅड. रिया करंजकर. 

चारचाकी गाडी आज-काल लोकांची फॅशन झालेली आहे. आपल्या अगोदरची पिढी रिटायर झाल्यावर मग कुठे दारात फोर व्हीलर उभी होत होती. आताची पिढी नोकरीला लागल्या-लागल्या बँकेकडून कर्ज घेऊन दारात फोर व्हीलर उभी करते. फोर व्हीलर म्हणजे प्रतिष्ठेचा विषय झालेला आहे. कुणी बँकेकडून कर्ज घेऊन, तर कोणी रोकड देऊन, तर कोणी परत आलेल्या गाड्या कमी किमतीत विकत घेत असतात.

रमेश याची फेसबुकद्वारे सुमित याच्याशी ओळख झाली आणि सुमित आपल्या दोन गाड्या विकत आहे हे त्यांनी फेसबुकला फोटोद्वारे टाकलेले होते. रमेशने सुमितला विचारले की, “गाड्या कितीपर्यंत विकत देणार?” त्यावर आम्ही २ गाड्यांची किंमत ११ लाख सांगितली व त्याच्याबद्दल सर्व डिटेल त्याने रमेशला पाठवले. रमेशला दोन्ही गाड्या पसंत पडल्या आणि तो कोल्हापूरवरून मुंबईला येऊन त्याने अकरा लाख रुपयांमध्ये चार लाख रुपये सुमितच्या बायकोला आरटीजीएस केले व बाकीचे पैसे कॅशने दिले व एक बॉण्ड पेपर बनवून त्याच्यावर घेणाऱ्याने देणाऱ्याची व्यवस्थित माहिती लिहून त्या गाड्या चावीसह आपल्या ताब्यात घेतल्या.

कोल्हापूरला गाडी घेऊन गेल्यानंतर त्याला असं समजलं की, या दोन्ही गाड्या सुमितने ड्रग्ज सप्लाय करताना वापरल्या होत्या आणि पोलिसांनी त्या पकडलेल्या होत्या. हे समजताच रमेश यांनी सुमितला कॉन्टॅक्ट केला व असं असल्यामुळे “मला माझी रक्कम परत दे आणि तुझ्या गाड्या तू परत घे” असं सांगितलं. त्यावेळी सुमितने “गाड्या मुंबईला घेऊन या. लगेच घेऊन या. आता नाही घेऊन आला, तर मी तुम्हाला रक्कम नंतर देऊ शकणार नाही.” त्यामुळे रमेशने त्या दोन्ही गाड्या मुंबईला आणल्या व सुमित याने त्याला एका हॉटेलमध्ये थांबवलं. “फ्रेश व्हा. मी तोपर्यंत पैसे आणतो”, असं सांगून चावी द्या, असं तो रमेशला बोलला.

रमेशने लगेच पैसे मिळणार असं कळल्यावर त्यांनी दोन्ही गाड्यांच्या चाव्या दिल्या व ते फ्रेश व्हायला गेले, तोपर्यंत सुमित दोन्ही गाड्या घेऊन पळून गेला आणि ही गोष्ट रमेशच्या काही वेळातच लक्षात आली. कारण, तो “थांबा येतो, थांबा येतो” असं म्हणून त्यांना तिथे थांबत होता आणि हॉटेलच्या खाली जाऊन बघितलं, तर दोन्ही गाड्या तिथे नव्हत्या. त्यावेळी रमेश यांनी पोलिसांमध्ये तक्रारी नोंदवली व किती दिवस आपण मुंबईला राहणार, म्हणून ते परत आपल्या कोल्हापूरला गेले.

रमेश दोन वर्षे झाले सतत सुमितला पैशांसाठी मागणी करत आहे, तर तो सरळ सांगत आहे की, “मी देणार नाही.” त्यापूर्वी त्याने ११ लाखांचे दोन चेक रमेश यांना दिलेले होते. तेही चेक बाऊन्स झालेले आहेत. गाड्या पोलिसांनी पकडल्यानंतर त्या गाड्या विकत घेताना ऑनलाइन ती गाडी क्लियर आहे की नाही, हे तीन महिन्यांनंतर कळतं आणि सुमित याने पोलिसांच्या ताब्यातून त्या गाड्या सोडवून तीन महिन्यांच्या अगोदर विकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गाडी घेणाऱ्या रमेशला गाड्यांबद्दल डिटेल माहिती ऑनलाइन मिळाली नव्हती. ड्रग्ज सप्लाय करताना त्या गाड्या पकडल्या गेलेल्या होत्या. त्यामुळे त्या कोर्टासमोर एक पुरावाच होता आणि तो पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न सुमित करत होता.
सुमितने रमेशकडून त्या गाड्या परत घेतल्या आणि दुसरीकडे विकून तो मोकळा झाला. तरीही तो रमेशचे पैसे देत नव्हता आणि पोलिसांना सांगत होता की, “मी रमेशला कॅश दिलेली आहे”, तेव्हा रमेश म्हणायचा, “तू मला कॅश दिली त्याचे पुरावे दे” आणि तो उडवाउडवीची उत्तरं देत असे.

सुमितने क्राइममध्ये पुरावा असलेल्या गाड्या विकल्या होत्या. एवढेच नाही, तर त्या दोन गिऱ्हाईकाने त्याने गाड्या विकून दोन्ही ग्राहकांना त्यांनी फसवलं होतं आणि स्वतः मात्र रक्कम वसूल केलेली होती. दोन वर्षे झाली. रमेश सुमितकडे पैशांची मागणी करत आहे.

स्वतःचेच ११ लाख रुपये त्याचे अडकले गेल्यामुळे त्याची मानसिक स्थिती बिघडलेली आहे की, आपण त्या गाड्या विकत घेतल्या होत्या आणि परत केल्या होत्या आपण क्राइममध्ये अडकणार नाही ना याची भीती त्याला वाटत आहे. कारण, त्या गाड्या ड्रक सप्लाय करताना वापरल्या गेलेल्या होत्या. रमेश मुंबईमध्ये सतत फेऱ्या घालतोय. अनेक पोलीस स्टेशनला जाऊन भेटी घेतोय. शेवटी त्याने सुमितवर केस टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कारण त्याच्या बायकोला त्यांनी आरटीजीएसमधून पैसे ट्रान्सफर केलेले होते. दोन चेक बाऊन्सही झालेले होते.

सेकंड हॅण्ड वस्तू खरेदी करताना त्या वस्तूबद्दल संपूर्ण डिटेल घेतल्याशिवाय गाडी खरेदी करू नका किंवा वस्तू खरेदी करू नका, नाहीतर विकणाऱ्यापेक्षा घेणाऱ्याला जास्त मनस्ताप करावा लागतो.

(सत्यघटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -