Sunday, October 26, 2025
Happy Diwali

पुण्याच्या आणे परिसरात बिबट्यांचा मुक्तसंचार, नागरिकांमध्ये भितीचं वातावरण...

पुण्याच्या आणे परिसरात बिबट्यांचा मुक्तसंचार, नागरिकांमध्ये भितीचं वातावरण...

उंब्रज येथे एका बालकावर हल्ला केल्यानंतर वनविभागाने सलग तीन दिवस लावलेल्या पिंजऱ्यात तीन बिबटे अडकले. ही घटना ताजी असताना नारायणगावच्या लोकवस्तीत एक नव्हे तर तीन बिबट्यांचा कळप रस्त्यावर फिरत होता. अशातच आज पुन्हा २ बिबटे ऐटीत एकामागोमाग जाताना मोबाइल मध्ये कैद झाले. वनविभागाने आणे परिसरात मुक्त संचार करणाऱ्या बिबट्यांचा वेळीच बंदोबस्त करायला हवा, नाहीतर हेच बिबटे भुक भागवण्यासाठी माणसांवर देखील हल्ला करतील यात शंका नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा