Wednesday, July 9, 2025

अजित पवार गटातर्फे थेट दिल्लीमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन

अजित पवार गटातर्फे थेट दिल्लीमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन


मुंबई : नागरिकत्व कायदा सुधारणा (सीएए ) कायद्याला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारकडून अधिसूचना जारी करून मान्यता देण्यात आली. त्यानंतर देशामध्ये पुन्हा रणकंदन माजल्यामुळे विशेषत: मुस्लिम समाजात अस्वस्थता पसरली आहे.


या पार्श्वभूमीवर आता मुस्लिम समाजाला समजावण्याची जबाबदारी अजित पवार गटाकडे देण्यात आली असून त्यांनी थेट दिल्लीमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे.


दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीत अजित पवार गट मुस्लिम समाजाला सीएए धोरणाबद्दल समजावून सांगणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वत: मुस्लिम समाजातील गणमान्य विविध व्यक्तींशी संवाद साधणार आहेत. दिल्लीमधील इंडियन इस्लामिक कल्चर सेंटरमध्ये अजित पवार उपस्थित राहणार असून यावेळी नागरिकत्व कायदा सुधारणा कायद्यावर चर्चा करणार असल्याची माहिती दिली आहे.

Comments
Add Comment