मुंबई : मुंबईतील ताडदेव परिसरात राहणाऱ्या एका १० वर्षीय मुलीवर ती रहात असलेल्या इमारतीमधील नराधम लिफ्टमनने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे.
ही संपूर्ण घटना इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहे. त्यानुसार, फुटेज हाती घेतले आहे. आरोपीवर या आधी कोणताही गुन्हा नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ९.३० ते ९.४५ दरम्यान हा गुन्हा घडला आहे. पीडितेने पोलिसांना सांगितले की, पीडत मुलगी दुसऱ्या विंगमध्ये जात होती. ती डी विंग मध्ये राहते. तीला वरच्या मजल्यावर जायचे होते. लिफ्ट मधून जात असताना लिफ्टमनने तिला वाईट हेतुने स्पर्श केला. ती ओरडू लागली तेव्हा तीच्या मानेवर त्याने चुंबनही घेतले. पीडित मुलगी संपुर्ण घाबरून गेली होती. संध्याकाळी ही घटना तीने आई वडिलांना सांगितली.
आई वडिलांनी आरोपीला झोडपले, त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. लल्लो पासवान असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सर्व फुटेज आणि पुरावे ताब्यात घेतले आहेत. आरोपपत्रासह न्यायालयात पूरावा म्हणून त्याचा वापर केला जाईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.