
मनसेचा 'पाडवा मेळावा' ९ एप्रिलला होणार
मेळाव्याला मुंबई महापालिकेची परवानगी
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) पाडवा मेळावा (MNS Padwa Mela) दरवर्षीप्रमाणे ९ एप्रिल रोजी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. मनसेच्या या मेळाव्याला मुंबई महानगरपालिकेने परवानगी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत सर्वांचे लक्ष पाडवा मेळाव्यात काय घडणार याकडे लागले आहे.
मेळाव्यासाठी मनसेची जय्यत तयारी सुरु आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार? लोकसभा संदर्भात घोषणा करणार का? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नुकतीच केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर मनसे आणि भाजप युतीच्या हालचालींचा वेग वाढलेला दिसून येत आहे. मनसे महायुतीत सहभागी होण्याबाबत चर्चा देखिल रंगल्या आहेत. त्यामुळे महायुती संदर्भात घोषणा होणार का? याकडे लक्ष लागले आहे.