Wednesday, August 6, 2025

Tamanna Bhatia : तमन्ना भाटिया दिसणार 'डेअरिंग पार्टनर्स' मध्ये!

Tamanna Bhatia : तमन्ना भाटिया दिसणार 'डेअरिंग पार्टनर्स' मध्ये!

मुंबई : पॅन इंडिया स्टार तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) ही कायम फॅशन आणि तिच्या नवनवीन प्रोजेक्ट्स मधून चर्चेत असते. नुकतेच तिने तिच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली. या बद्दल ती म्हणते, मी माझ्या आगामी प्रोजेक्ट 'डेअरिंग पार्टनर्स' बद्दल खूप उत्साहित आहे. ज्यामध्ये डायना पेंटीसोबत स्क्रीन शेअर करत आहे.


'डेअरिंग पार्टनर्स' ही दोन जिवलग मित्रांची कथा आहे जे अल्कोहोल स्टार्ट-अपचे भागीदार म्हणून एक धाडसी प्रवास सुरू करतात. याची कथा खूप सुंदर लिहीली आहे. या प्रकल्पा बद्दल आता सगळ्यांना उत्सुकता आहे आणि ती यात काय भूमिका साकारणार हे बघण उत्कंठावर्धक असणार आहे.


अर्चित कुमार आणि निशांत नाईक दिग्दर्शित 'डेअरिंग पार्टनर्स'मध्ये जावेद जाफरी यांचीही भूमिका आहे. चित्रपटाचे लेखन नंदिनी गुप्ता, मिथुन गंगोपाध्याय आणि आर्ष व्होरा यांनी केले आहे. 'डेअरिंग पार्टनर्स'च्या पलीकडे तमन्ना यावर्षी अनेक मनोरंजक प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. अभिनेत्रीकडे तेलगूमध्ये 'ओडेला २', हिंदीमध्ये वेदा आणि तमिळमध्ये 'अरनमानाई ४' मध्ये ती दिसणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >