
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या लोकसभा निवडणुकीसाठी पहिले ९ उमेदवार जाहीर झाले आहेत. यात बारामती, माढा, सातारा, शिरुर, नगर दक्षिण, बीड आणि वर्धा या जागांचा समावेश आहे.
राज्यभरात चर्चेत असणाऱ्या माढा लोकसभेची जागा शरद पवारांनी महादेव जानकर यांच्या रासपसाठी सोडली आहे. तर महायुतीसाठी हा मोठा धक्का आहे.
खासदार सुप्रिया सुळे या बारामती, माढ्यातून महादेव जानकर, साताऱ्यातून माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील किंवा श्रीनिवास पाटील हे उमदेवार असतील. तर शिरुरमधून अमोल कोल्हे, नगर दक्षिणमधून निलेश लंके, बीडमध्ये बजरंग सोनावणे किंवा ज्योती मेटे तर वर्ध्यातून अमर काळे हे उमेदवार असणार आहेत.
जागा आणि संभाव्य उमेदवार
बारामती-सुप्रिया सुळे
माढा-महादेव जानकर(रासप)
सातारा-बाळासाहेब किंवा श्रीनिवास पाटील
शिरुर-अमोल कोल्हे
नगर दक्षिण-निलेश लंके
बीड-बजरंग सोनवणे किंवा ज्योती मेटे
वर्धा-अमर काळे