Sunday, April 20, 2025
HomeदेशMahayuti : महायुतीची आज पुन्हा दिल्लीमध्ये बैठक!

Mahayuti : महायुतीची आज पुन्हा दिल्लीमध्ये बैठक!

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह राज ठाकरेही राहणार उपस्थित

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर भाजपाचे ४०० पार जाण्यासाठी अतोनात प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्रातही महायुतीने (Mahayuti) यासाठी चांगलाच जोर लावला आहे. त्यासाठी महायुतीच्या सातत्याने बैठकाही होत आहेत. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचंही नाव महायुतीसोबत जोडलं जात आहे. या युतीबाबत राज ठाकरे यांनी स्वतः जाहीर भाष्य केलेलं नसलं तरीही महायुती त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. तसेच मागील काही दिवसांमध्ये राज ठाकरे यांनीही महायुतीच्या बैठकांना हजेरी लावली आहे.

यानंतर आज पुन्हा एकदा दिल्लीमध्ये महायुतीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह राज ठाकरेही हजेरी लावणार असल्याचे समजत आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये महायुतीची ही दुसरी बैठक पार पडणार आहे. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे महायुतीत सहभागी होण्याबाबत राजकीय वर्तुळातील चर्चांनी जोर धरला आहे. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक बैठक केल्याचा दावा केला जात आहे. तसेच काल मुंबईतील हॉटेल ताज लॅण्डस या ठिकाणीही राज ठाकरे यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. यातच भाजपा नेत्यांनी राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असल्यास स्वागत करू, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे भविष्यात मनसे महायुतीत सहभागी झाली तर वावगे वाटायला नको.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -