
मुंबई: बदलत्या हवामानात आपण अनेकदा पाणी कमी पितो आणि यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होतो. यामुळे आपल्या आरोग्यास नुकसान पोहोचते. डिहायड्रेशनपासून वाचायचे असेल तर काही सवयी आजच लावून घ्यायला हव्या.
पुरुषांनी कमीत कमी ३.७ लिटर लिक्विड घेणे गरजेचे असते तर महिलांनी २.६ लीटर, जर तुमचे पाणी पिण्याचे प्रमाण योग्य आहे तर तुमचे शरीर चांगले कार्य करते. तसेच यामुळे तुम्ही शारिरीक आणि मानसिकरित्या अॅक्टिव्ह राहता.
अनेकांना बऱ्याचदा डिहायड्रेशनची समस्या सतावते. यामुळे त्यांना चक्कर येणे, थकवा जाणवणे, उल्टी येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे या समस्या सतावतात. अशातच तुम्हाला स्वत:ला हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी काही सवयी आजच लावून घ्या.
तहान लागल्यास लगेचच पाणी प्या. जर तुम्ही तहानेकडे दुर्लक्ष केलं तर ते महागात पडू शकतं.
सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावा.
जर तुमचे तोंड सतत सुकत असेल तर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता आहे. यावेळेस भरपूर पाणी प्या. तोंड सुकत आहे असे वाटल्यास लगेचच पाणी प्या.
दिवसभरात ८ ते १० ग्लास पाण्याचे सेवन करणे गरजेचे असते. मात्र बदलत्या हवामानात जितके पाणी प्याल तितका फायदा होईल.
जेव्हा तुम्ही वर्कआऊट कराल तेव्हा पाणी पिणेही वाढवा. व्यायामादरम्यान शरीरातून पाणी बाहेर टाकले जाते. यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात प्या.