Saturday, July 20, 2024
Homeक्रीडाIPL 2024IPL 2024 : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात ‘नया भारत’ची झलक

IPL 2024 : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात ‘नया भारत’ची झलक

चेन्नई : आयपीएल २०२४ च्या उद्घाटन सोहळ्याला बॉलीवूडचे कलाकार आणि गायकांनी उपस्थिती लावत चार चाँद लावले. मात्र याचवेळी उद्घाटन सोहळ्यावेळी चांद्रयान मोहीमेच्या देखाव्याला देखील विशेष स्थान देण्यात आलं होते. याचबरोबर सोनू निगम आणि एआर रहमान यांनी माँ तुझे सलाम हे गाणे सादर करत चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याकडे पाहून या कार्यक्रमाद्वारे नया भारतची झलक दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट जाणवत होते.

आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात चांद्रयान मोहीमेचे अॅनिमेशन देखील दाखवण्यात आलं. त्याचबरोबर गाण्यांच्या कार्यक्रमात देशभक्तीपर गाण्यांची संख्या देखील जास्त होती.

आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याची सुरूवात ही अक्षय कुमार आणि तिरंग्याने झाली होती. अक्षय कुमार तिरंगा हातात घेऊन मैदानावर आला. त्यानंतर टायर श्रॉफ देखील स्टेजवर आला. या दोघांनी देशभक्तीपर गाण्यांवर आपली अदाकारी सादर केली. त्यानंतर बॉलीवूड साँगवर हे दोघे थिरकले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -