मुंबई: Vodafone Idea (Vi) चा भारतात मोठा युजरबेस आहे. जिओ आणि एअरटेलनंतर Vodafone Idea (Vi) भारताची तिसऱ्या नंबरची सगळ्यात मोठी प्रायव्हेट टेलिकॉम कंपनी आहे. आता या टेलिकॉम कंपनीने भारतात नवा प्रीपेड प्लान लाँच केला आहे. याची किंमत १६९ रूपये आहे.
Vodafone Idea (Vi) या किफायतशीर प्लानच्या मदतीने युजर्स आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करेल. या प्लानमध्ये इंटरनेट डेटा आणि एंटरटेनमेंटची सुविधा मिळते. हा ADD-ON Data Pack आहे.
Viचा १६९ रूपयांचा रिचार्ज प्लान
Vi चा हा नवा प्रीपेड प्लान आहे. याची किंमत १६९ रूपये आहे. या प्लानमध्ये युजर्सला २८ दिवसांच्या जागी संपूर्ण ३० दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल.
मिळणार इतका डेटा
Viच्या या प्लानमध्ये युजर्सला एकूण ८ जीबी डेटा वापरायला मिळणार आहे. यात युजर्सला कोणतेही डेली लिमिट नाही. याचा वापर ३० दिवसांपर्यंतही केला जाऊ शकतो.
या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला प्रीमियम OTT कंटेटला वापरण्याची संधी मिळेल. युजर्स अगदी सहज या प्लानमध्ये डिस्ने प्लस हॉटस्टारचा वापर ९० दिवसांपर्यंत करू शकतात.
Viच्या या नव्या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला डेटा आणि एंटरटेनमेंटची सुविधा तर मिळणार मात्र कॉलिंग आणि एसएमएसचा फायदा नाही घेऊ कणार. कॉलिंगचा फायदा घेण्यासाठी युजर्सला १५५ रूपयांचा रिचार्ज करू शकता. याची व्हॅलिडिटी २४ दिवसांची आहे.