Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीराजकीय

Prakash Ambedkar : मविआशी बोलणी फिस्कटल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी धरला 'हा' नवा मार्ग

Prakash Ambedkar : मविआशी बोलणी फिस्कटल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी धरला 'हा' नवा मार्ग

लोकसभेसाठी वंचित कोणासोबत करणार युती?


मुंबई : वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) देत असलेल्या वागणुकीमुळे नाराज असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज केलेल्या वक्तव्यामुळे या गोष्टीला आणखी पुष्टी मिळाली. 'आमचा चार जागांचा प्रस्ताव वंचितने मान्य केला असता तर नक्की आनंद झाला असता', असं संजय राऊत म्हणाले. युतीबाबत भूतकाळ वापरल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यानंतर संजय राऊतांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत होऊ घातलेली युती फिस्कटल्याचे सर्वांच्या लक्षात आले.


वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी तर दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरील विश्वास उडाला असल्याचे विधान केले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला (Congress) पूर्ण पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. मात्र, आता प्रकाश आंबेडकर मविआचा हात पूर्णपणे सोडून वेगळ्या वाटेवर चालणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याचं कारण म्हणजे वंचितने बीएसआर (BRS) पक्षासोबत युतीच्या चर्चा सुरु केल्या आहेत.


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीआरएस पुन्हा 'अॅक्शन मोड'वर आली आहे. प्रकाश आंबेडकर आणि के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. केसीआर यांचा निरोप घेऊन मराठवाड्यातील भारत राष्ट्र समितीचे नेते कदीर मौलाना अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला गेले आहेत.


महाविकास आघाडीशी सुरू असलेली बोलणी जवळपास फिस्कटल्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी आता अन्य पर्याय शोधण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी बीआरएस वंचितसोबत युती करण्यास इच्छुक असल्याचं कळतंय. मराठवाड्यातील बीआरएसचे नेते कदीर मौलाना यांनी आंबेडकरांची अकोल्यात भेट घेतली. कदीर यांच्यामार्फत केसीआर यांनी आंबेडकरांसमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी आंबेडकरांना दोन मोठ्या शासकीय कार्यक्रमांना देखील निमंत्रित केलं होतं. त्यामुळे आता भविष्यात बीसीआर-वंचित आघाडीची युती होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment