नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) यांचा भूतान दौरा स्थगित करण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की पंतप्रधान मोदींचा २१-२२ मार्चचा भूतान दौरा तेथील खराब हवामानामुळे स्थगित करण्यात आला आहे. या दौऱ्याच्या नव्या तारखांची लवकरच घोषणा केली जाणार आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत विधान जारी करत म्हटले, पारो एअरपोर्टवर खराब हवामानाच्या स्थितीमुळे पंतप्रधान मोदींचा भूतानचा राजकीय दौरा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही देश आता नव्या तारखेचा विचार करत आहेत.
पंतप्रधान मोदी भूतानला कधी जाणार होते?
पंतप्रधान मोदी २१-२२ मार्चला भूतानचा राजकीय दौरा करणार होते. पंतप्रधान या दौऱ्यादरम्यान भूतानचे नरेश जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि त्यांचे वडील जिग्मे सिंग्ये वांगचुक यांची भेट घेणार होते. याशिवाय पंतप्रधान मोदी शेरिंग टोबगे यांच्याशीही बातचीत करणार होते.
दोन्ही देशांसाठी का महत्त्वाचा होता दौरा?
पीएमओने म्हटले पंतप्रधान मोदींचा हा दौरा दोन्ही देशांचे परस्पर हिताच्या द्विपक्षीय तसेच क्षेत्रीय बाबतीत विचारांचे आदान-प्रदान करण्यासाठी आहे.