मुंबई: आजकाल लोक आपल्या झोपण्याच्या पद्धतीत बदल करत आहेत. यातील एक म्हणजे जमिनीवर झोपणे. जे अनेकजण आपल्या चांगल्या आरोग्यासाटी तसेच चांगल्या झोपेसाठी जमिनीवर झोपण्याची सवय करत आहेत. जाणून घेऊया जमिनीवर झोपण्याचे हे आहेत फायदे…
जमिनीवर झोपल्याने शरीराचे पोस्चर योग्य राहते. यामुळे पाठीचा कणा सरळ आणि स्वभाविक स्थितीत राहतो. यामुळे पाठदुखी तसेच मानदुखी कमी होते.
अनेकांचे म्हणणे असते जमिनीवर झोपल्याने चांगली गाढ आणि आरामदायक झोप मिळते. यामुळे शरीर अधिक रिलॅक्स होते.
जमिनीवर झोपल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत थंडपणा जाणवतो. कारण जमीन हवा आणि थंडपणा अधिक शोषून घेते.
जेव्हा तुम्ही जमिनीवर झोपता तेव्हा शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. यामुळे मांसपेशीचा तणाव कमी होतो तसेच शरीराच्या अनेक अंगांना व्यवस्थित रक्त पोहोचते.
जमिनीवर झोपताना चटई अथवा चादर अंथरून झोपा. यामुळे सुरूवातीला थोडे असहज वाटू शकते मात्र हळूहळू त्याची सवय होईल.