मुंबई: जिओने धन-धना-धन ऑफरची घोषणा केली आहे. दरम्यान, कंपनीने या ऑफरची घोषणा AirFiber युजर्ससाठी केली आहे.
काय आहेत फायदे?
जिओ AirFiber Dhan Dhana Dhan ऑफर केवळ नव्या ग्राहकांसाठी आहे. या ऑफरमध्ये युजर्सला तीन पटीने अधिक स्पीड मिळणार आहे.
दरम्यान, याचे फायदे सर्व प्लान्सवर मिळणार नाही. कंपनीने निवडक प्लान्सवर दोन महिन्यांसाठी तीन पटीने अधिक इंटरनेट स्पीड ऑफर केली आहे.
ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे आणि याचा फायदा Jio AirFiber Plusसोबत मिळेल. यात ग्राहकाने ३०एमबीपीएसचा प्लान खरेदी केली तर त्याला १०० एमबीपीएसचा स्पीड मिळेल.
जिओचा हा फायदा दोन महिन्यांसाठी मिळेल. कंपनीच्या ३० एमबीपीएसच्या प्लानची सुरूवात ५९९ रूपयांपासून होते. तर १०० एमबीपीएसचा प्लान ८९९ रूपयांचा आहे.
या ऑफरच्या मदतीने युजर्स ६०० रूपयांची बचत करू शकतात. जे ग्राहक १०० एमबीपीएसचा प्लान खरेदी करतील त्यांना ३०० एमबीपीएसचा स्पीड मिळेल.
जिओची ही ऑफर ५९९, ११९९ आणि १४९९ रूपयांच्या रिचार्ज प्लानसोबत मिळत आहे. हे प्लान्स अनुक्रमे ३० एमबीपीएस, १०० एमबीपीएस आणि ३०० एमबीपीएसचा स्पीड ऑफर करतात.
कंपनीच्या या रिचार्ज प्लानसोबत ऑन डिमांड टीव्ही चॅनेल्स, अनेक OTT प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस तसेच इतर अनेक फायदे मिळत आहेत.