नवी दिल्ली: दारू घोटाळा प्रकरणात आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायलयाने मोठा झटका दिला आहे. उच्च न्यायलयाने दिल्लीचे मुख्यमंत्री यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता. अटकेपासून दिलासा देण्यास नकार देत दिल्ली उच्च न्यायालयाने ईडीकडून उत्तर मागितले आहे. उच्च न्यायलयात या प्रलंबित याचिकेसह या याचिकेवरही २२ एप्रिलला सुनावणी होणार आहे.
ईडीने न्यायालयाला दाखवले पुरावे
दिल्ली उच्च न्यायालयात लंच ब्रेकनंतर सुरू झालेल्या सुनावणीदरम्यान ईडीने कोर्टाला सांगितले की कोणत्या पुराव्यांच्या आधारे केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले जात आहे. ईडीने न्यायालयाला आग्रह केला होता की तथ्ये केवळ न्यायालयाने पाहावीत अरविंद केजरीवाल यांच्या वकीलांना दाखवू नये.
ईडीकडून सांगण्यात आले की हे कोणतीही निवडणूक लढवत नाही आहेत. हे विपसनेला कधीही जातात मात्र ईडीकडे जात नाहीत. कोर्टाने ईडीला म्हटले की तुम्ही इतके समन्स पाठवले आहेत तर सरळ अटक का करत नाहीत.
अरविंद केजरीवाल यांची बाजू जाणून घ्यायची आहे – ईडी
ईडीने म्हटले की आम्हाला त्यांची बाजू जाणून घ्यायची आहे. त्यांनी आमच्यासमोर येऊन आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा अंतरिम दिलासा दिला गेला नाही पाहिजे.