Wednesday, July 17, 2024
Homeताज्या घडामोडीZomato Delivery App : ग्राहकांच्या विरोधानंतर झोमॅटोने 'तो' निर्णय एका दिवसात घेतला...

Zomato Delivery App : ग्राहकांच्या विरोधानंतर झोमॅटोने ‘तो’ निर्णय एका दिवसात घेतला मागे!

कालच केली होती घोषणा

मुंबई : ऑनलाईन फूड डिलीव्हरीसाठी (Online Food Delivery) सगळ्यांत जास्त पसंती मिळत असलेल्या अॅप्सपैकी झोमॅटो (Zomato app) हे एक अॅप आहे. झोमॅटो कंपनीने भारतातील शुद्ध शाकाहारी (Pure veg) ग्राहकांसाठी काल एक नवा निर्णय घेतला होता. जो अनेकांना रुचला नसल्याने कंपनीने एका दिवसात हा निर्णय मागे घेतला आहे.

कंपनीचे संस्थापक आणि सीईओ दीपंदर गोयल (Deepinder Goyal) यांनी ही प्युअर व्हेज मोड सेवा सुरू करण्याची घोषणा केली. भारतातील शुद्ध शाकाहारी ग्राहकांकरता हिरव्या रंगाच्या कपड्यातील डिलीव्हरी पर्सन आणि हिरव्या रंगाच्या बॅगेतून खाद्यपदार्थांची डिलीव्हरी करण्याचा निर्णय झोमॅटो कंपनीने घेतला होता. यासोबतच कंपनीच्या सीईओने त्या लोकांचाही हवाला दिला ज्यांना भारतात नवीन सेवा उपलब्ध करून द्यायची आहे.

‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना दीपंदर गोयल यांनी लिहिले की, भारतात शाकाहारी लोकांची संख्या जगात सर्वाधिक आहे. लोकांच्या फीडबॅकच्या आधारेच आम्ही ही नवीन सेवा सुरू केली आहे. झोमॅटोच्या शाकाहारी ग्राहकांसाठी लाल रंगाच्या बॉक्सऐवजी हिरव्या रंगाचे बॉक्स वापरण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासोबतच डिलिव्हरी बॉय फक्त हिरवा शर्ट घालणार आहे. हे जेवण फक्त शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंटमधून मिळेल. मात्र, या सेवेला वाईट प्रतिसाद मिळाल्यास आम्ही ती बदलू, असेही त्यांनी लिहिले होते.

काल गोयल यांच्या घोषणेनंतर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया समोर आल्या. झोमॅटोच्या या निर्णयाला मोठ्या संख्येने लोकांनी विरोध केला. आज आपण व्हेज खातोय की नॉनव्हेज, हे समाजाला सांगू नये, असंही अनेकांनी म्हटलं आहे. या निर्णयावर अनेकांनी संताप व्यक्त केला. अशा स्थितीत आज उशीर न करता गोयल यांनी आपला निर्णय लगेच मागे घेतला आहे.

नवं ट्विट करत दिली निर्णय मागे घेतल्याची माहिती

गोयल यांनी एक्सवर नवीन ट्विट करत लिहिले आहे की, ‘आमच्या प्युअर व्हेज फ्लीटवर अपडेट – आम्ही शाकाहारी लोकांसाठी फ्लीट सुरू ठेवू, पण डिलिव्हरी पार्टनरसाठी हिरवा डबा आणि हिरवा टी-शर्ट वापरण्याचा निर्णय आम्ही मागे घेत आहोत. आमचे सर्व रायडर्स लाल रंगाचे कपडे परिधान करतील. याचा अर्थ असा की शाकाहारी ऑर्डरसाठीचा फ्लीट ओळखला जाणार नाही (परंतु ॲपवर असे दिसून येईल की तुमची ऑर्डर फक्त शाकाहारी फ्लीट घेऊन येत आहे). आम्हाला हे समजले आहे की आमचे काही मांसाहारी ग्राहक यामुळे अडचणीत येऊ शकतात. आणि आमच्यामुळे असे घडले तर ती चांगली गोष्ट नाही. त्याचबरोबर आमच्या रायडर्सची शारीरिक सुरक्षा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

काल रात्री याबद्दल बोलल्याबद्दल सर्वांचे आभार. तुम्ही आम्हाला या रोलआउटचा परिणाम समजावून सांगितला. हे खूप प्रभावी होते. आम्ही अनावश्यक उद्धटपणा किंवा गर्व न दाखवता नेहमीच तुमचं ऐकू. आम्ही तुमच्या सेवेत तत्पर आहोत’, असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -