Tuesday, April 29, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा युगेंद्र पवारांना घेराव

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा युगेंद्र पवारांना घेराव

बारामतीमधील प्रतिष्ठेचे राजकारण रस्त्यावर उतरले

पुणे : लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच राजकीय पक्षांच्या प्रचारालाही सुरुवात झाली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा पवारविरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. त्यात अजित पवारांविरोधात त्यांच्या घरातील सख्ख्या भावासह इतर मंडळी उतरली आहेत. त्यात आता अजित पवारांची सोशल मीडियावर होणारी बदनामी पाहून काही कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना घेराव घातला.

युगेंद्र पवार हे श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना घेराव घालत अजितदादांची सोशल मीडियात बदनामी करणाऱ्यांना आवर घाला अशी मागणी त्यांनी केली. त्यावेळी युगेंद्र पवार यांनी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करू असं आश्वासन दिले. सोशल मीडियात श्रीनिवास पवारांचे भाषण सध्या व्हायरल होतंय. त्यामुळे अजितदादा समर्थक जाब विचारण्यासाठी आले होते.

युगेंद्र पवार सध्या सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात गावभेटी दौरा करत आहेत. तर पवार कुटुंबातील इतर मंडळीही सुप्रिया सुळेंच्या प्रचारात गुंतले आहेत. त्यात नुकतेच अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी काही गावकऱ्यांशी संवाद साधला. त्या संवादात श्रीनिवास पवारांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली. त्यानंतर माध्यमांमध्ये हा व्हिडिओ समोर आला. तेव्हापासून बारामतीत अजित पवारांचे कार्यकर्ते आणि शरद पवारांचे कार्यकर्ते यांच्यात कुरघोडी सुरू असल्याचे बोलले जाते.

Comments
Add Comment