Sunday, July 14, 2024
Homeक्रीडाIPL 2024: RCBने बदलले आपले नाव, लोगो आणि जर्सी

IPL 2024: RCBने बदलले आपले नाव, लोगो आणि जर्सी

मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने(royal challengers bangalore) आयपीएल २०२४(ipl 2024) सुरू होण्याच्या ठीक आधी आपले नाव बदलले आहे. विराट कोहली, स्मृती मंधाना आणि फाफ डू प्लेसिस यांनी आरसीबीचे नवे नाव , लोगो आणि जर्सीचे अनावरण केले.

फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वात आरसीबीने आपल्या नावातून बंगलोर हा शब्द हटवला आहे. त्याच्या जागी बंगळुरू हा शब्द लावण्यात आला आहे. आता रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे नवे नाव रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू झाले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा संघ इंडियन प्रीमियर लीगमध्ये नाव बदलणारा तिसरा संघ आहे. याआधी दिल्ली कॅटिपल्स आणि पंजाब किंग्स यांनीही आपले नाव बदलले आहे. दिल्ली कॅपिटल्सचे जुने नाव दिल्ली डेअरडेविल्स आहे. पंजाब किंग्सचे आधीचे नाव किंग्स इलेव्हन पंजाब होते. दरम्यान, नाव बदलल्यानंतरही हे दोन्ही संघ आयपीएलचा खिताब मात्र जिंकू शकले नाही. त्यामुळे आता हे पाहावे लागेल की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नाव बदलून काही फायदा होतो का ते.

आरसीबीचा संघ त्या ८ संघांपैकी एक आहे जो आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून खेळत आहे. १६ वर्षांच्या आयपीएलच्या प्रवासात आरसीबीची संघ तीन वेळा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचला. मात्र त्यांना खिताब जिंकण्यात अपयश आले. विराट कोहलीने सर्वाधिक १४३ सामन्यांमध्ये नेतृत्व केले. त्याने दोनदा संघाला फायनलमध्ये पोहोचवले मात्र विजेतेपद मिळवता आले नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -