Wednesday, November 13, 2024
Homeताज्या घडामोडीHoli Festival : होळीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये याकरता पोलिसांच्या मार्गदर्शक सूचना

Holi Festival : होळीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये याकरता पोलिसांच्या मार्गदर्शक सूचना

मुंबई : होळी आणि धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आता मार्गसूचना (Holi Guidelines) जारी केल्या आहेत. त्यामध्ये या कालात जमावबंदी आणि हत्यारबंदी असे आदेश जारी करण्यात आले आहेत. तसेच ध्वनी प्रदूषणावर (Noise Pollution) नियंत्रण ठेवण्यासाठीही काही आदेश देण्यात आले आहेत. राज्यात आचारसंहिता (Code Of conduct) सुरू असून विविध राजकीय पक्षांकडून (Political Parties) उत्सवाचा वापर हा निवडणूक प्रचाराकरता (Propaganda) होण्याची शक्यता असल्याने योग्य ती खबरदारी घेण्याच्या पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत.

काय आहेत निर्देश?

  • सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखवल्या जातील अशा चित्रफीती तसेच समाजसुधारक, थोर व्यक्तींबद्दल आक्षपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  • धुलिवंदनावेळी परंपरेनुसार चालत आलेल्या प्रथेनुसार काही लोक भांगमिश्रीत दूध प्राशन करतात, त्यामुळे दूध भेसळ तसेच दूध भेसळीमुळे विषबाधा होऊ शकते. त्याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
  • पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोल, अॅसिड, स्फोटक पदार्थ, तलवारी, चॉपर, सुरे, अग्निशस्त्रे इत्यांदीचा साठा अनधिकृतपणे ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु शकणाऱ्यांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  • पोलीस ठाण्याच्या ह‌द्दीमध्ये अफवा पसरवणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या कपड्यांतील पोलीस तैनात ठेवण्याच्या सूचना आहेत.
  • काही मुलतत्त्ववादी किंवा जातीयवादी संघटनांचे नेते, कार्यकर्ते यांच्या हालचालीवर तसेच त्यांची कार्यालये, शाखा व चौका चौकात लावलेले सूचना फलक इत्यादीवर जाणीवपूर्वक, जबाबदारीने व बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना आहेत.
  • राष्ट्रीय नेत्यांच्या पुतळ्यांकडे, धार्मिक स्थळांकडे/प्रार्थना स्थळांकडे विशेष करून पहाटे लक्ष देण्यात यावे. विशेषतः धुलीवंदनाच्या दिवशी लोकांच्या इच्छेविरूद्ध जबरदस्तीने वर्गणी गोळा करणे, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून असभ्य वर्तन करणे, विभत्स हावभाव करून नाचवणे, लोकांच्या इच्छेविरूद्ध रंग टाकणे, रंगाचे फुगे मारणे, मुलींची/स्त्रियांची छेडछाड करणे, शिवीगाळ, मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
  • रंगाचे फुगे टाकणे, रंग फेकणे इत्यादीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी, असे प्रकार करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना आहेत.
  • सर्व परिमंडळामध्ये मोक्याच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार आळीपाळीने नाकाबंदीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषकरून बाहेरून येणाऱ्या गाड्या, काळया काचा लावलेली वाहने, डिकीमध्ये जास्त माल भरलेली वाहने यांची तपासणी करण्याच्या सूचना आहेत.
  • नाकाबंदीसाठी तैनात करण्यात येणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक/सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी प्रत्यक्ष हजर राहून जातीने मार्गदर्शन करावे असे निर्देश देण्यात आले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -