मुंबई: वास्तुशास्त्रानुसार जर आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाले आहात तर काही उपाय तुमचे नशीब नक्कीच बदलून टाकेल. वास्तुशास्त्रानुसार घरातील मंदिरात एक छोटीसी वस्तू ठेवल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते.
वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही तुमच्या घराच्या मंदिरात शंख ठेवत असाल तर हे करणे अतिशय शुभ असते.
हिंदू धर्मानुसार शंख हा भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांना अतिशय प्रिय आहे.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या मंदिरात शंख ठेवल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात.
घरात जर आर्थिक त्रास सुरू असेल तर ते दूर होतात. ती व्यक्ती कधीच कंगाल होत नाही.
यासोबतच घरात सुख-समृद्धीचा वास होतो. घरातील वातावरण नेहमीच आनंदाचे राहते.
घरात नकारात्मकता शिरण्याचा प्रयत्न करत असेल तर ती बाहेरच राहते. घरात नेहमी सकारात्मक वातावरण राहते.