Friday, March 21, 2025
Homeताज्या घडामोडीManoj Jarange Patil : मनोज जरांगे यांच्यावर आठ गुन्हे दाखल; सभेची परवानगीही...

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांच्यावर आठ गुन्हे दाखल; सभेची परवानगीही नाकारली

जरांगेंविरोधात पोलीस आक्रमक

बीड : मराठा आंदोलनाचे (Maratha Protest) नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) बाबतीत जितके आक्रमक होत आहेत तितक्याच त्यांच्या अडचणी अधिकाधिक वाढत आहेत. माध्यमांसमोर बोलताना जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका व गंभीर आरोप केले होते. तेव्हापासून त्यांच्या आंदोलनाची धार कमी झाली आहे. शिवाय त्यांच्याविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे.

जरांगे पाटील हे सध्या बीड दौऱ्यावर (Beed Visit) आहेत. बीड जिल्ह्यात त्यांच्यावर आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यात मागील आठवड्यातील दोन दिवसांमध्ये त्यांच्याविरोधात पाच गुन्हे दाखल करण्यात आले होते. सोबतच मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या जेसीबीवर देखील पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. यासाठी पोलिसांनी जेसीबी चालक आणि मालकांचा शोध सुरु केला आहे.

मनोज जरांगे या सगळ्या अडचणींना सामोरे जात असतानाच बीड पोलिसांनी त्यांना आणखी एक धक्का दिला आहे. लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) आदर्श आचारसंहिता (Code Of Conduct) लागू असल्याचे कारण देत बीड जिल्ह्यातील परळी वैजिनाथ येथे आयोजित मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्याने याविरोधात संयोजकांनी थेट औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench) धाव घेतली. या याचिकेवर खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील आणि न्या. शैलेश ब्रह्मे यांच्यासमोर आज सकाळी सुनावणी अपेक्षित आहे.

मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे सतत वेगवेगळ्या जिल्ह्याचा दौरा करत बैठका घेत आहेत. अशात परळी वैजिनाथ येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मार्केट यार्डात जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज मार्च सायंकाळी ६ वाजता बैठक बोलावली होती. या बैठकीची जनतेला माहिती व्हावी, यासाठी संयोजकांनी परळी शहर आणि संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षकांकडे ऑटोरिक्षावर ध्वनिक्षेपक वाजविण्यासाठी १३ मार्च रोजी रीतसर अर्ज केले होते. पोलिसांनी १६ मार्चला काही अटी शर्ती घातल्या. याविरोधात संयोजकांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला होता. पण, लोकसभेची आचारसंहिता लागू झाली असल्याने जात, धर्म, भाषेवर एकत्र येऊ नका, असा आदेश देण्यात आला. त्यामुळे या नोटीसला सभेचे संयोजक दत्तात्रय विठ्ठलराव गव्हाणे आणि व्यंकटेश शिंदे यांनी अॅड. सुदर्शन साळुंके यांच्यामार्फत खंडपीठात आव्हान दिले आहे.

२४ मार्चच्या बैठकीला परवानगी मिळणार का?

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाबाबत आंतरवाली सराटीमध्ये २४ मार्च रोजी महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राज्यभरातील आणि इतर राज्यातील मराठा बांधव उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, राज्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू आहे, त्यामुळे या बैठकीला पोलिसांकडून परवानगी मिळणार का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -