
लखनऊ: उत्तर प्रदेशातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एका बाबा कॉलनीमध्ये एका व्यक्तीने दोन मुलांची हत्या केली. यानंतर तो फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच आरोपीचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर त्याने गोळीबार केला. यावेळी पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरादाखल गोळीबारत आरोपी ठार झाला.
या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहो. पोलीस आणि प्रशासनाने शांततेचे आवाहान केले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार त्यांना मंडी समिती चौकीजवळ बाबा कॉलनीमध्ये एका घरात घुसून व्यक्तीने ११ आणि ६ वर्षांच्या दोन छोट्या मुलांची हत्या केली. यानंतर लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. लोकांना शांतता राखण्यास सांगितले. दोन्ही मुलांचे मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले. आतापर्यंत हत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार झाला. प्रकरणाचा तपास केला जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. आरोपी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी पोलिसांना पाहताच त्याने गोळीबार सुरू केला. यावेळी पोलिसांनीही त्याला प्रत्युत्तर दिले. यात तो मारला गेला. आरोपीचे वय २५ ते ३० वय यादरम्यान होते. या हल्ल्यात दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. एक मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.