Sunday, April 27, 2025
Homeक्रीडाधोनी समजून गेला होता की क्रिकेट त्याच्यासाठी सर्वस्व नाही, कारण...IPL आधी झहीर...

धोनी समजून गेला होता की क्रिकेट त्याच्यासाठी सर्वस्व नाही, कारण…IPL आधी झहीर खान का म्हणाला असं?

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबाबत मोठे विधान केले आहे. झहीर खानने म्हटले की एमएस धोनीसाठी क्रिकेट महत्त्वाचे आहे मात्र सर्वस्व नाही, हे त्याला खूप आधीच समजले होते.

आपल्या नेतृत्वात भारताला त्याने आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकून देणाऱ्या ४२ वर्षीय एमएस धोनी आयपीएल २०२४च्या आगामी हंगामात चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व सांभाळत आहे. धोनीने चार वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले होते.

झहीर खानने धोनीवर बनलेल्या एका एपिसोडमध्ये म्हटले, एमएस धोनीला खूप आधी समजले होते की त्यांच्यामध्ये क्रिकेटप्रती प्रेम आहे आणि हे त्याच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र क्रिकेट हे सर्वस्व नाही.

भारताला टी-२०, वनडे वर्ल्डकप जिंकवणे तसेच टेस्ट रँकिंगमध्ये नंबर वनपर्यंत पोहोचण्याशिवाय धोनीने आपल्या नेतृत्वात सीएसकेला पाचवेळा आयपीएलचा खिताब जिंकून दिला आहे. तो २००८ मध्ये पहिल्या हंगामात सीएसकेचा कर्णधार होता. झहीर याबाबत म्हणाला, जेव्हा तुम्ही खेळत असता तेव्हा खेळातून स्विच ऑफ होणे महत्त्वपूर्ण असते. क्रिकेटच सर्वस्व नसते. प्रत्येक क्रिकेटरला याचा सामना करावा लागतो.

जेव्हा तुम्ही खेळापासून वेगळे होता तेव्हा खूप पर्याय नसतात. आम्ही अनेक खेळाडूंना रिटायर झाल्यानंतर संघर्ष करताना पाहिले आहे कारण ते आपलं सर्वस्व खेळासाठी अर्पण करतात आणि जेव्हा ते खेळापासून वेगळे होतात तेव्हा त्याला समजत नाही की पुढे काय करायचे. धोनी खेळांशिवाय इतरही गोष्टी करतो. त्याला बाईकचा शौक आहे आणि त्यावर रिसर्च करत राहतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -