Tuesday, December 3, 2024
HomeदेशBank: बँकेची कामे राहिली आहेत का? तर हे नक्की वाचा

Bank: बँकेची कामे राहिली आहेत का? तर हे नक्की वाचा

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार रविवारी ३१ मार्चलाही बँका सुरू राहणार आहेत. आरबीआयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ट्वीट तर या निर्णयाची माहिती दिली. केंद्रीय बँकेने म्हटले की ३१ मार्च २०२४ला रविवार असतानाही सर्व बँका सुरू राहतील. चालू आर्थिक वर्ष २०२३-२४चा शेवटचा दिवस असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

आरबीआयने म्हटले की ३१ मार्चला आर्थिक वर्षाची समाप्ती आहे. यासाठी सर्व बँका खुल्या राहतील. सर्व बँकांना पाठवलेल्या आदेशामध्ये म्हटले आहे की आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत होणारे व्यवहार त्याच दिवशी दिसले पाहिजे यासाठी सर्व बँकांना रविवारच्या दिवशी काम करण्यास सांगितले आहे. सर्व बँक ३१ मार्चला रविवारी आपल्या नियमित वेळेत उघडतील आणि बंद होतील. शनिवारीही सर्व बँका सुरू राहतील. याशिवाय एनईएफटी आणि आरटीजीएसचे व्यवहारही रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहतील. याशिवाय सरकारी चेक क्लिअरिंगसाठीही विशेष सोय केले जाईल. दरम्यान, स्टॉक मार्केट बंद राहील.

इनकम टॅक्स ऑफिसही सुरू राहणार

याआधी इनकम टॅक्स विभागानेही आपली सर्व कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. विभागाने गुड फ्रायडेच्या सुट्टीसहित शनिवारी आणि रविवारची सुट्टीही रद्द केली होती. इनकम टॅक्स विभागाने गुड फ्रायडेमुळे या महिन्यात येणाऱ्या लाँग वीकेंडला रद्द केले होते. गुड फ्रायडे २९ मार्चला आहे. ३० मार्चला शनिवार आणि ३१ मार्चला रविवार आहे. यासाठी ३ दिवसांची मोठी सुट्टी येत होती. मात्र इतकी सुट्टी असल्यास अनेक कामे रखडणार होती. त्यामुळे ही संपूर्ण सुट्टी रद्द करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -