मुंबई: भारतीय किचनमध्ये मसाल्याच्या पदार्थांचा वापर अगदी सढळ हाताने केला जातो. हे मसाल्याचे पदार्थ जरी स्वाद वाढवण्याचे काम करत असले तरीही त्यांच्या वापराने आरोग्यही सुधारते. अनेक आजारांवर हे मसाल्याचे पदार्थ गुणकारी ठरतात. त्यामुळे साध्या सोप्या आजारासाठी किचनमधील पदार्थांचा वापर केला जातो. त्यातीलच एक पदार्थ म्हणजे ओवा. ओवा
ओव्याचा वापर खाण्या-पिण्याच्या गोष्टींचा स्वाद वाढवण्यासाठी केला जातो. ओवा आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. रात्रभर एक चमचा ओवा एका ग्लासात पाण्यात भिजत ठेवा.
सकाळी उठल्यानंतर हे ओव्याचे पाणी प्यायल्यास अनेक आजारांपासून सुटका मिळू शकते.
ओव्याच्या सेवनाने डायजेशनचा त्रास बऱ्याच प्रमाणात बरा होतो. ओव्याच्या बियांचा अर्क पेप्टिक अल्सरशी लढण्यास मदत करतो.
याचा अर्क गॅस आणि जुन्या अपचनाला रोखण्यास तसेच त्यावर उपचार करण्यास मदत करतो.
ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे अशा रुग्णांनीही ओव्याचे पाणी प्यायल्याने खूपच फायदेशीर ठरू शकते.
ओव्याच्या सेवनाने खोकल्यापासूनही सुटका मिळते.